बीड : राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी (दि.३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला. बीडची जागा सेनेकडे गेल्याने महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांना मोठा धक्का बसला आहे.
बीड मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांना गतवेळी अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीडमध्ये भाजपच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली होती. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी महायुतीत बीडची जागा शिवसंग्रामसाठी सोडवून घेण्यासाठी ते ईषेला पेटले होते.
रविवारी (दि.२९) शिवसंग्रामच्या समर्थकांनी क्षीरसागरांच्याच राजुरी गावातून नवगण गणपती मंदिराचे दर्शन घेऊन रॅली काढली होती. श्रीक्षेत्र नारायणगडावर नारळ वाढवून रणशिंग फुंकले होते. मात्र आधीच मुंबई मुक्कामी असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आपले वजन वापरून शिवसेनेची उमेदवारी पदरात पाडून घेत युतीतील इच्छुक स्पर्धकांना हादरा दिला. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी एबी फॉर्म स्वीकारला. युतीची घोषणा होण्याआधीच शिवसेनेने बीडची उमेदवारी मंत्री क्षीरसागरांना दिली आहे.
- Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- Tata Power Share: टाटा पॉवर कंपनी शेअरने दिला 3517% चा परतावा! प्रसिद्ध ब्रोकिंग फर्मने दिली टार्गेट प्राईस
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल