अरे व्वा ! आता येणार Apple ची कार ; वाचा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल 2024 पर्यंत कारचे उत्पादन सुरू करू शकते. ही प्रवासी कार त्याच्या स्वत: च्या अॅडव्हान्स बॅटरी तंत्रज्ञानावर आधारित असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 2014 पासून प्रोजेक्ट टायटन या नावाने वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याचे काम करत आहे, जेव्हा कंपनीने आपल्या वाहनाचे डिझाइन तयार केले होते.

पण नंतर कंपनीने काही पावले मागे घेतली आणि सॉफ्टवेअरवर आपले लक्ष केंद्रित केले. न्यू एजेन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रोजेक्ट टायटन या नावाने 2024 पासून ऑटो सेक्टरमध्ये पाऊल टाकण्यासाठी काम करत असून कंपनीने आपल्या वाहनाचं एक डिझाइनही तयार केलं आहे.

परंतु सध्या कंपनीने आपलं लक्ष त्यावरून हटवून, सॉफ्टवेअरवर केंद्रीत केलं आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, सध्या अ‍ॅपलने या प्रोजेक्टची माहिती स्वत:हून सार्वजनिक केलेली नाही.

2018 मध्ये अ‍ॅपलचे माजी वरिष्ठ कर्मचारी डोग फील्ड, हा ऑटो प्रोजेक्ट पाहण्यासाठी कंपनीतही आले होते. त्यानंतर याप्रकरणी मोठी प्रगती झाली असल्याची माहिती आहे. न्यूज एजेन्सीने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, आता कंपनीचं लक्ष्य ग्राहकांसाठी एक उपयोगी वाहन बनवण्याचं आहे.

गूगलशी करणार स्पर्धा :- अॅपलला सामान्य लोकांसाठी उपयुक्त वाहन बनविण्यासाठी इतर अनेक दिग्गजांशी स्पर्धा करावी लागू शकते. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकनेही वेमो नावाची एक रोबो टॅक्सी विकसित केली आहे जी ड्रायव्हरलेस कार आहे. अॅपलची रणनीती मुळात नवीन बॅटरी डिझाइन करणे आहे ज्यामुळे बॅटरीची किंमत लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि वाहनाचे ऑपरेटिंग तास वाढेल.

कंपनीने आता या बातमीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अॅपल हा जगभरात प्रसिद्ध असलेला एक ब्रँड आहे आणि फोन, टॅब्लेटपासून ते फिटनेस बँडपर्यंतचे त्याचे उत्पादन अत्यंत प्रीमियम दर्जाचे आहे आणि लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment