ग्रामपंचायत निवडणूक! ‘या’ तालुक्यामधील गावांमध्ये विखेंचे वर्चस्व

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील पंचवीस गावांत निवडणुका होत आहेत. त्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींवर विखे समर्थकांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे.

तेथे महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने हालतचाली सुरू झालेल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे.

तेथे आमदार विखे यांचा गट व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गट अशी सरळ लढत होईल. त्यात जेथे अस्तित्व असेल, तेथे थोरात गट राष्ट्रवादी व शिवसेनेला काही जागांपुरती संधी देईल.

रामपूरवाडी व शिंगवे ही दोन गावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तेथे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटात लढत होईल.

राहाता तालुक्यातील 23 गावांत विखे समर्थकांचे वर्चस्व अधिक आहे. त्यातील बर्‍याच गावांत विखे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहून निवडणुका लढवितात.

दरम्यान यावेळी येथे महाविकास आघाडीचे स्वतंत्र मंडळ उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुरुवातीला खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या इच्छुकांची शिर्डी येथे बैठक घेतली.

या बैठकीत शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडी विरुद्ध विखे असा सामना पहायला मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment