अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला आहे. सगळी धरणे, नद्या, तलाव तुडुंब भरली आहे. यामुळे नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला असे मानले जात होते.
मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊनही शेवगाव तालुक्यातील नागरिक तहानलेले आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही, शेवगाव शहराला 12 दिवसानंतर पिण्याचे पाणी येते.
त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंडन आंदोलन करण्यात आले. शहरातील क्रांती चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व वंचित आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी केले.
शेवगाव शहरात ग्रामपंचायत असताना तीन-चार दिवसांआड नळाला पाणी येत होते. मात्र, पालिका झाल्यापासून नागरिकांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही.
सध्या जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले असतानाही 10 ते 12 दिवसांतून एकदा पाणी मिळते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved