अहमदनगर ब्रेकिंग : मशीनमध्ये अडकून एकाच मृत्यू; या कारखान्यात घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-श्रीर्गोदा येथील सहकारमहर्षि शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मशिन बेल्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी कंत्राटदार, ठेकेदार व कारखान्याच्या चिफ मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मधुरा जयसिंग सुर्यवंशी, (वय ३०, धंदा नोकरी, सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अ. नगर आशिष बंगला, सथ्या कॉलनी, स्टेशन रोड,

नगर यांनी श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी कंत्राटदार संदीप शंकर घाडगे, रा. ढोकराई फाटा, श्रीगोंदा नागवडे कारखान्याचा चिफ इंजिनिअर रामचंद्र गोविंद मखरे रा. श्रीगोंदा कारखाना या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मधुरा सुर्यवंशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे

दि. १७ रोजी रोजी ४.३० च्या सुमारास सहकारमहर्षि शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गॅस विभागातील ब गॅस मशिन बेल्टमध्ये अडकून समीर बिरजुभाई शेख, (वय १४ वर्ष, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा) हा अल्यवयीन आहे

हे माहीत असतानाही तेथे कामाला ठेवून सदर समीर शेख हा अल्पक्यीन मुलगा गॅस मशिनच्या बेल्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.

त्याला हॉस्पिटलमध्ये हडपसर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंत्राटदार, ठेकेदार व कारखान्याच्या चिफ मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment