नागवडे कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून उपाध्यक्षाचा राजीनामा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- सहकारमहर्षी महर्षी शिवाजीराव नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्याचे राज्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्ट कारभार करत काखाना अवसायनात काढण्याचा जणू विडाच उचलला आहे.

गेली ४५ वर्ष कारखाना प्रामाणिकपणे ज्यांनी चालविला त्याच कारखान्याला गालबोट लागल्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे आपण नागवडे साखर कारखानाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली .

मढेवडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मगर बोलत होते. केशव मगर पुढे म्हणाले कि, बापूंनी तीनवेळा राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले, पण कारभार बापूंनीच केला. बापुंच्या निधनानंतर कारखान्यात एकाधिकारशाही सुरू झाली. गेल्या काही वर्षात कारखान्यात अनेक घोटाळे झाले.

आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत यावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचा आवजा नेहमीच दाबण्याचा प्रयत्न झाला. सह वीज निर्मिती प्रकल्प हाती घेतला मात्र तो वेळेवर सुरु न झाल्याने शासनाने ८० लक्ष रुपयांची अनमात रक्कम जप्त केली. प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या न घेतल्या गेल्याने पर्यावरण विभागाने ७० लाखाचा दंड केला.

दोन महिन्यांपूर्वी कारखाना सूरु झाला मात्र अद्याप वीजनिर्मिती प्रकल्प सुरू नाही परिणामी कारखान्याचा दररोज १५ लाखाचा तोटा होत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल मगर यांनी केला. छत्रपती शिक्षण संस्थेत पैसे घेऊन शिक्षक भरती केली. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खलावला.

श्रीगोंदा शहरात असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कमी झालेला ओढा दर्जा खालावल्याचे प्रतीक आहे. बगॅस, मळी, लोखंडी साहित्याच्या चोरीबाबत कारखाना प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.

आण्णासाहेब शेलार म्हणाले राजेंद्र नागवडे यांनी परभणीला खाजगी कारखाना घेतला त्यामुळे पाचपुतेंच्या खाजगीकरणावर  त्यांचा बोलण्याचा अधिकार संपला आहे. सहकारात आमचे बापू हे केशव मगर हेच असून आम्ही आगामी कारखाना निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment