ग्रामपंचायत निवडणूक…पहिल्याच दिवशी ३ अर्ज दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी देहरे गावातून तीन अर्ज दाखल झाले. तालुक्यातील 216 प्रभागांमधून 583 सदस्य निवडले जाणार आहेत.

त्यासाठी 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

दरम्यान कागदपत्रांची जमवाजमव करण्यातच इच्छुकांची दमछाक होत आहे. ५९ गावांसाठी ३० निवडणूक अधिकारी आहेत. माहिती घेणे, कागदपत्रांची जमवाजमव करणे यातच इच्छुकांचा वेळ गेला.

अर्जाबरोबर एकूण १७ कागदपत्रे सोबत जोडणे बंधनकारक असल्याने त्यांची पूर्तता करण्यात इच्छुकांची चांगलीच धांदल उडाली आहे. अनेकांनी तहसील कार्यालयात येऊन कागदपत्रांची माहिती घेतली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली, तरी शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने निवडणुकीचे कामकाज बंद राहणार आहे.

त्यामुळे येत्या सोमवारनंतरच अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. कागदपत्रे गोळा करण्यात इच्छुकांची होते दमछाक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment