अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व रिशेप जीम आयोजित रक्तदान शिबीरात फिरोज पठाण यांनी स्वतः व कुटूंबातील चौघांनी रक्तदान केले.
समवेत, प्रा. किसनराव माने, डॉ. संजय लड्डा, डॉ. मनिषा लड्डा व इतर. शेवगाव दि. २४ ( प्रतिनीधी ) रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व रिशेप जीमतर्फे शेवगाव येथे आयोजित रक्तदान शिबीरात मंगळवारी (दि. २२ ) सुमारे ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना संकट काळात रूग्णांना रक्तपुरवठ्यात अडचण येऊ नये यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीरात नगर येथील अर्पण रक्तपेढीच्या तंत्रज्ञानी रक्तदात्यांचे रक्तसंकलन केले.
रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, रिशेप जीमचे संचालक डॉ. संजय लड्डा व डॉ. मनिषा लड्डा, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी यांच्या उपस्थितीत कोरोनाचे शासकिय नियम पाळत रक्तदान शिबीराला सुरूवात झाली.
या रक्तदान शिबीरात फिरोज पठाण यांनी स्वतः तसेच त्यांची पत्नी शाहिन पठाण, मुले फरदिन व फराण अशा एकाच कुटूंबातील चौघांनी रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. रक्तदानाला सकाळी १० वाजता सुरूवात झाल्यानंतर उत्स्फुर्तपणे रक्तदाते रक्तदान करीत होते.
अर्पण रक्तपेढीचे तंत्रज्ञ भाग्यश्री पवार, अशोक लोखंडे, समाधान तिडके आदींनी रक्तसंकलन करण्यासाठी परिश्रम घेतले. कोरोना संकट काळात रूग्णांना रक्तपुरवठ्यासाठी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे दोन वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. पहिले रक्तदान शिबीर लोकमान्य हॉस्पीटल येथे आयोजित केले होते.
तर आज मंगळवारी रिशेप जिम येथे दुसरे रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने यांनी दिली. प्रा. माने, चौधरी, रक्त संकलन केंद्राचे संचालक डॉ. गणेश चेके, रिशेप जीमचे संचालक डॉ संजय लढ्ढा व मनिषा लढ्ढा, डॉ. भागनाथ काटे, दिलीप फलके,श्री. अण्णासाहेब दिघे, डॉ. आशिष लाहोटी, डॉ. दिनेश राठी, श्री मनिष बाहेती,
श्री. काकासाहेब लांडे, डॉ विकास बेडके, डॉ प्रतीक्षा बेडके, श्रीमती स्नेहलता लबडे, मा. श्री प्रशांत भालेराव, श्री बाळासाहेब मुरदारे, श्री रितेश जाजू, डॉ. दिपक परदेशी, के वाय नजन, केदारनाथ मंत्री, मुधोळकर सर, युसुफ खान, हरिश्चंद्र गवळी, योगेश वधवा,
डॉ. मयूर लांडे, आत्माराम निकम, पी. ए. फलके, प्रवीण लाहोटी, योगेश बाहेती, अभिजित काकडे, सुधाकर जावळे, डॉ. सुयोग बाहेती, डॉ. वैद्य, बबन म्हस्के, आशिष टोटला, विष्णु गायकवाड, दिपक तागड आदींनी परिश्रम घेतले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved