विखे व ससाणे गटाला धक्का.

Published on -

श्रीरामपूर : काँग्रेसला जय महाराष्ट्र करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधत भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. आता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोेध करणाऱ्या विखे, ससाणे गटाला धक्का बसला आहे.

आता या दोन्ही गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने कांबळे यांना उमेदवारी दिली. यावेळी विखे यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला असता कांबळे यांनी विखेंची साथ सोडत थोरातांचा हात पकडला. लोकसभा निवडणुकीत खा. सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केला. त्यानंतरच्या काळात थोरात यांच्याबरोबर राहून कांबळे यांची पुढील वाटचाल सुरू होती.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांबळे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ससाणे, विखे व नंतर थोरात अशा सर्वांचीच साथ सोडत कांबळेंनी आपले राजकारण पुढे सुरू ठेवले. श्रीरामपूर मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने कांबळेंना उमेदवारी मिळू नये यासाठी कांबळे विरोधी सर्वच गट सक्रिय झाले. शिवसेनेतूनही त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला गेला. दोन दिवसांपूर्वी ससाणे गटाने थेट मिलिंद नार्वेकरांची भेट घेत कांबळेंच्या उमेदवारीला विरोध केला.

तत्पूर्वी गेल्या आठवड्यात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपुरात येऊन करण ससाणे, दीपक पटारे, प्रकाश चित्ते, ससाणे गटातून वेगळे झालेले नगरसेवक अशा वेगवेगळ्या गटाच्या स्वतंत्र बैठका घेत मत जाणून घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!