त्याने फोडले हॉटेल चालकाचे डोक, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- वडापाव हा लोकप्रिय खाण्याचा पदार्थ आहे. तो हॉटेल चालकाने खाण्यास न दिल्याने गिर्‍हाईकाने हॉटेल चालकाचे डोके फोडण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील स्टॅण्डसमोरील हॉटेल गुरुकूपा मध्ये काल ७ वा. घडला.

जखमी हॉटेल चालक अमोल मछिंद्र शिंदे, (वय ४० रा.विसापूर) यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी गणेश अंकुश माळी (रा. शिंदे मळा, विसापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जखमी अमोल शिंदे या हटिल चालकाने फिर्यादीत म्हटले आहे की, गिऱ्हाईक म्हणून गणेश अंकुश माळी हा हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी आला

त्याला वडापाव न दिल्याचा राग येवून त्याने शिवीगाळ करुन दगड डोक्यात मारुन डोके फोडले. पोनि माने यांच्या मार्गदर्शनाखाली सफो गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!