अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- एक लग्न कार्य आटपून घराकडे निघालेल्या एक व्यक्तीचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ज्ञानदेव उर्फ नंदकुमार भाउ करपे (वय ५० रा. मुंगशी, ता. पारनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
करपे हे पारनेर शहरातील एस कुमार टेलर्सचे संचालक होते. याबाबत अधिकल माहिती अशी कि, करपे यांच्या मित्राच्या मुलीचा विवाह होता. त्या विवाहानंतर गुरूवारी पहाटे ते दुचाकीवरून मुंगशीकडे निघाले होते.
पारनेर सुपे रस्त्यावरून म्हसणे फाट्याकडे वळताना करपे यांना वळणाचा अंदाज आला नाही. त्यांची दुचाकी थेट खड्डयात जाउन पडली. त्यात ते बेशुद्ध झाले पडला.
रात्रीची वेळ असल्याने करपे यांच्या दुचाकीची अपघात कोणाच्याही लक्षात आला नाही. परिणामी त्यांना तब्बल चार ते पाच तास मदत मिळू शकली नाही.
त्यातच त्यांचे निधन झाले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कन्हेरओहळ परिसरातील नागरीकांना झुडूपात दुचाकी पडल्याचे दिसून आले.
त्यांनी पाहणी केली असता दुचाकीखाली नंदकुमार करपे हे आडकेलेले असल्याचे लक्षात आले. पोलिसांना माहीती देण्यात आल्यानंतर करपे यांचा मृतदेह झुडूपातून बाहेर काढण्यात आला. शहरातील ग्रामिण रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved