हॉटेलवर धाडी टाकत साडेबारा हजारांची दारू जप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जामखेड शहरातील अवैध देशी विदेशी दारूविक्री करणा-या विविध हॉटेलवर जामखेड पोलींसानी छापा टाकला आहे. पोलिसांच्या या कारवाईत बेकायदा दारू विक्रेत्याकडून १२ हजार ५०० रुपये किमतीचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जामखेड पोलिसांची बेकायदा दारू विक्रेत्यावर धडक कारवाई सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरात विविध ठिकाणी अवैध देशी, विदेशी दारूची विक्री चालु असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह हॉटेल कृष्णा, हॉटेल शिवराय, नगररोडवरील हॉटेल कावेरी, हॉटेल समता , तसेच चुंबळी फाट्यावरिल हॉटेल रसिका अशा ५ हॉटेलवर छापा टाकला.

यावेळी बेकायदा दारू विक्रेत्याकडून साडेबारा हजारांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या व हॉटेल चालक यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News