श्रीरामपूर : पाण्याने तुडुंब भरलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यात रविवारच्या सुटीचा अन् पोहणे शिकण्याचा आनंद घेत असतानाच दोन भावंडांपैकी महेश संतोष मुठे (वय १५) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे घडली.
याबाबतची सविस्तर हकिगत अशी, मुठेवाडगाव येथील बेलापूर एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगाव विद्यालयातील विद्यार्थी रविवारच्या सुटीत हरेगाव रस्त्यावर असलेल्या आपल्या घरातून आई-वडिलांना सुटीची मदत म्हणून वडिलाऐवजी दोघे बंधू गायी चारण्यासाठी हरेगाव रस्त्यावर ओढ्यावरील पडकात गेले. गायी चारत असताना थोरला महेश यास पोहणे शिकण्याचा मोह आवरेना, तो कपडे काढून बंधाऱ्यात कडेला पोहत होता. इयत्ता सातवीत शिकणारा लहान भाऊ विष्णू संतोष मुठे हा काठावर उभा होता. कडेला पोहता पोहता महेश खोलवर जाऊन दिसेनासा झाल्यावर विष्णू मदतीसाठी आरडाओरड करू लागला.
परंतु, जवळपास कुणी नव्हते, म्हणून दूरवर पाचपिंड यांच्या शेतावर माणसे दिसत असल्याने मदतीसाठी त्याने तिकडे धावत गेला. तिकडून मदतीसाठी तरुण घटनास्थळी आले. मदत मिळेपर्यंत सर्व खेळ आटोपलेला होता. तरीही महेश यास उपचारासाठी श्रीरामपूर येथे रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी महेश यास मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदनानंतर महेशच्या पार्थिवावर मुठेवाडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?