अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जगभरात कोरोनाची साथ संपत नाही तोच भारतात नवीन रोगांची साथ पसरत आहे.केरळ राज्यात ‘शिगेला’ हा संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आपले आहे. केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात त्याचे पेशंट सापडत आहेत.
त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य प्रशासन सज्ज असल्ल्याची माहिती दिली आहे.
कोझिकोड जिल्ह्यात एक दीड वर्षीय मुलगा शिगेला रोगाचा पेशंट म्हणून सापडला आहे.त्या मुलाला पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने त्याची तपासणी केली असता त्याला शिगेला रोग झाल्याच निष्पन्न झाला .
शिगेला हा आतड्यांचा आजार आहे.केरळमध्ये आतापर्यंत शीगेलाचे ८ रुग्ण सापडले आहे. कोझिकोड जिल्ह्यात याआधीही वेगवेगळ्या रोगांच्या साथ आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.कोझिकोड जिल्ह्यात याआधी निपाह विषाणूचे रुग्ण सापडले होते.
तेथील जिल्हा अआरोग्य अधिकारी सांगतात की , “जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रशासन आवश्यक पाऊल उचलत आहे. “शिगेलाचे रुग्ण सापडल्यापासून कोझिकोड जिल्हा आरोग्याच्या बाबतीत अलर्टवर आला आहे.
शिगेला रोगाचे अतिसार हे महत्वाचे लक्षण आहे. संक्रमित जेवण आणि पाण्यामुळे शिगेला जिवाणूंचा संसर्ग वेगान होत आहे.लोकांनी सतर्क राहताना अतिसाराचा त्रास उदभवल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अस आवाहन डॉ. जयश्री यांनी दिल आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात २६ जणांना अतिसाराचा त्रास झाला आहे.
केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर शिगेला रोगाची साथ पसरत आहे. केरळमधील मुंडिक्कलथजम, कोट्टापरांबू आणि वायनाडमध्ये शिगेलाचे रुग्ण सापडले आहेत. शिगेला रोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या १ असून मृत्यू पावणारा रुग्ण अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. बळी गेलेला मुलगा कोझिकोडमधील असून त्याचे वय वर्ष ११ आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved