आज पंतप्रधान मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार पैसे; वाचा..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज 12 वाजता पीएम किसान सम्मान निधि निधीतून पैसे पाठवतील.

आज पीएम किसान योजनेंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 18000 कोटी रुपये पाठविले जातील. पीएम किसानचा 7 वा हप्ता आज शेतकर्‍यांच्या बँक खात्यात येत आहे.

आज पीएम मोदी 6 राज्यातील लाखो शेतकर्‍यांशी वर्चुअल चर्चा करतील. भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज 96 वी जयंती आहे. अटल जी यांच्या कार्यक्रमातच ही रक्कम शेतकर्‍यांना दिली जाईल.

 स्वतः पीएम मोदी यांनी ट्विट करुन माहिती दिली :- पीएम मोदींनी काल आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘उद्याचा दिवस देशाच्या अन्नदात्यांसाठी फार महत्वाचा आहे. दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करण्याची संधी मिळेल. या निमित्ताने अनेक राज्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधतील.

हि आहे पीएम किसान योजना :- पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे वर्षामध्ये 3 हप्ते मिळतात. अशा प्रकारे एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना मोदी सरकारने 1 डिसेंबर 2018 रोजी लागू केली. या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविले जातात.

9 कोटी शेतकर्‍यांना पैसे मिळतील :- आज 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी 9 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवतील. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात पीएम मोदी 6 राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दिल्लीतील हजारो शेतकरी नवीन कृषी कायद्यांचा निषेध करत आहेत. हे लक्षात घेता पंतप्रधान मोदी शेतकर्‍यांशी बोलतील असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment