अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- मंगल कार्यालयासमोर नवरदेवाची मिरवणूक पाहणे एकास चांगलेच महागात पडले आहे.
नवरदेवाची मिरवणूक पाहत असताना त्याच्या हातातील पिशवीत असलेले साडेचार लाख रूपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना जामखेड येथे घडली.
याप्रकरणी निलेश उध्दवराव देशमुख यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथील कर्जत रोडवरील त्रिमुर्ती मंगल कार्यालयासमोर असलेल्या पंटागणात नवरदेव परण्याची मिरवणूक सुरू होती.
यावेळी फिर्यादी देशमुख हे त्यांच्या हातात असलेल्या कापडी पिशवीत ९ तोळे सोन्याचे दागिने घेवून जात होते.दरम्यान ही मिरवणूक पाहण्यासाठी ते थांबले.
मिरवणूक पाहत असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातात असलेली कापडी पिशवी ब्लेडच्या साहाय्याने कापून साडे चार लाख रूपये किमतीचे ९ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
ही घटना गुरूवार दि.२४ रोजी घडली. याबाबत निलेश उध्दवराव देशमुख यांनी जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved