कोरोनामुळे श्री क्षेत्र देवगड येथील यात्रोत्सव रद्द

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नेवासे तालुक्‍यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सवास अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाने प्रारंभ झाला.

पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, रात्री वीस ते पंचवीस भाविकांच्या उपस्थितीत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान कोरोनाची परिस्थिती पाहता मंगळवार (दि.29 डिसेंबर) सकाळ पासून ते बुधवार (दि.30 डिसेंबर) रोजी सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम,

देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगड कडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून श्री क्षेत्र देवगड येथील नविन स्वागतद्वारही पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती मंदिर संस्थान प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यात्रा रद्द असल्याने कोणत्याही व्यावसायिकांनी देवगड येथे दुकाने आणण्याचा प्रयत्न करू नये, सर्व भाविक भक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरनियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासन व प्रशासन यांनी घालवून दिलेल्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने दत्तजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थानने घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News