चार वर्षातील सातवे मुख्याधिकारी ‘या’ नगरपालिकेत झाले रुजू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर नगरपालिकेचे चार वर्षातील सातवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्ताने नगरपालिका शिक्षक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब गांगड व प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक रवी पाटील, रईस जहागिरदार, शिक्षक बँकेचे ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, नपा सेवा निवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, मुख्याध्यापक शिवाजी भालेराव,अजय शिंदे, आसिफ मुर्तुजा, एजाज चौधरी,

शिक्षण मंडळाचे निवृत्त लिपिक विलास निकम, लतीफ शेख,शब्बीर शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन आदी उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे सर्व प्रश्न मला माहित आहेत.

ते सर्व आपण सोडवू त्याचबरोबर शहराच्या विकासाचे सुद्धा प्रश्न सर्वांना सोबत घेऊन सोडवू असे या प्रसंगी नूतन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले.

मुख्याधिकारी शिंदे यांनी यापूर्वी सहा नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केले असून श्रीरामपुर ही त्यांची सातवी नगरपालिका आहे.

त्यांना या पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या काळामध्ये श्रीरामपूर शहराचे पालिकेशी संबंधित महत्वाचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा नगरसेवक बाळासाहेब गांगड यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!