अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदारसंघात मागील २०१४च्या निवडणुकीतही या दोन्ही भय्यांमध्येच प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.
त्यामुळे या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेली, व त्याचा फायदा जगतापांना झाला. २५ वर्षे आमदारकी केल्यानंतर राठोडांचा त्यावेळी पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदा युती व आघाडी अशी लढत होणार आहे.
राठोड यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (३ ऑक्टोबर) दाखल होणार असून, त्याचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. तर जगतापांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे जाहीर झाल्य़ावर त्यांच्याही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. मात्र, अर्ज भरण्यापूर्वीच निवडणूक प्रचाराची प्राथमिक तयारी दोन्ही भय्यांनी सुरू केली आहे.
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा