अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुकीचा नारा दिला होता, याला आता सकारात्मक साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच टाकळीढोकेश्वर गटातील राजकियदृष्टया महत्वपूर्ण असलेल्या काताळवेढे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय शनिवारी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हंगे येथे पार पडलेल्या बैठकित घेण्यात आला.
गावातील सर्व प्रमुख गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विविध गटांनी आपल्या भुमिका मांडल्यानंतर आ. लंके यांनी बिनविरोध निवडणूक गावाच्या कशी फायद्याची आहे, यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हेवेदावे दुर ठेवा. निवडणूकांमुळे गावात संघर्ष निर्माण होऊन त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. सर्वजण एक असतील तर गावाच्या विकाससाठी निधी उपलब्ध होईल.
त्यानंतर सर्वांनी जुने वाद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय जाहिर केला. निर्णयानंतर आ. लंके यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
दरम्यान यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले कि, तुम्ही एकत्र या पुढील पाच वर्षे सर्व अडचणी दुर करण्याची जबाबदारी घेतो अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved