डॉ.निलेश शेळके याची पोलिस कोठडीत रवानगी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप प्रकरणी शेळके याच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे.

तेव्हापासून हा फरार होता. सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असताना त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान निलेश शेळकेतर्फे ऍड. संजय दुशिंग, ऍड.महेश तवले, ऍड.संजय वालेकर यांनी काम पहिलं.

नगरमधील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित बाळ बोठे याचा शोध घेत असताना पोलिसांनी पुण्यातून डॉ.निलेश शेळके याला ताब्यात घेतले होते. बोठे पसार होण्यात शेळके याची काही मदत झाली का, या अनुशंगाने त्याच्याकडे चौकशी केली गेल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment