भाजपाकडून बदल्याचे राजकारणः वडेट्टीवार

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- भारतीय जनता पक्षाकडून देशात बदला घेण्याचे राजकारण सुरू करण्यात आले आहे.लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब धोक्याची घंटा आहे. सत्ता ही सर्वकाळ कोणाकडे कायम राहत नसते.

भाजपाला याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन केंद्रिय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ओ.बी.सी., व्ही.जे. आणि एन.टी. समाजाच्या जिल्हास्तरीय जनमोर्चा नगरला झाला.या मोर्चात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार आले होते.

या मेळाव्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजपच्या धोरणांवर कडाडून टिका केली. वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतभिन्नता असू शकते. मात्र, मन भिन्नता नको. एकमेकांना उद्धवस्थ करणे धोक्याचे आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केल्यानंतरच लगेच इर्डीची चौकशी त्यांच्या मागे लावली.

हे बदला घेण्याचे राजकारण आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधातील आघाडीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, असा सूर काही ठिकाणी उमटत आहे.

आघाडीमध्ये जो पक्ष मोठा असतो, त्या पक्षाने नेतृत्व असते. त्यातून राष्ट्रीयस्तरावरील नेतृत्व हे काँग्रेसकडेच राहणार असे स्पष्ट केले. महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काँग्रेस बळकट होत आहे.

नागपूरची जागा 58 वर्षांनी काँग्रेसने जिंकली आहे. पुणे पदवीधर मतदार संघाची जागा ही काँग्रेसने जिंकली आहे. अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट सुरू झाली आहे.