अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुक उमेदवार निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ करू लागले आहे. यातच काही ठिकाणी महिला आरक्षण देखील आहे.
कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये निम्म्याहून अधिक महिलाच असणार आहेत. कोल्हार बुद्रुकमध्ये 17 पैकी 9 जागा तर भगवतीपूरकरिता 15 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव आहेत.
दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज दिसून येईल. 28 ऑगस्ट 2020 रोजी मागील ग्रामपंचायत कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला.
गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकाच्या हाती दोन्ही गावांचा कारभार सुरू होता. येथे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 10 हजार 237 मतदार उमेदवारांचे भाग्य ठरवतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड हे काम पाहतील.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved