प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार : आमदार तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक होणे गरजेचे आहे.

यासाठी ग्रामविकास मंत्री, तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी, बदल्या, शिक्षण विभागातील सुधारित आकृतिबंध, पदोन्नती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडचणी, कक्ष अधिकारी यांना वर्ग २ चा दर्जा,

वरिष्ठ सहाय्य पद १०० टक्के पदोन्नतीने भरणे, गृहबांधणी कर्ज, जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, कोषाध्यक्ष भरत घुगे, कार्याध्यक्ष गणेश तोटे, राजेश तिटमे, संतोष खैरनार, चेतन चव्हाण,

रामदास मिसाळ, संजय आरगडे, दीपक जोशी, संतोष देशमुख, शांताराम आव्हाड, प्रवीण कुऱ्हे, प्रवीण चव्हाण, विकास वर्पे, जगदीश पवार, प्रदीप कुदळ, किशोर कुलथे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment