स्वतःला फकीर म्हणवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांची संपत्ती तब्बल…

Published on -

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष म्हणून नीलेश लंके यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी निवडणूक अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केले.

निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आ.विजय औटी यांच्या विरोधात बोलताना ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नसल्याचे वक्तव्य केले होते, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे.

लंके यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ५८ लाख ५६ हजार ५२१ रुपयांची जंगम, तर १५ लाख ३५ हजार १५३ रुपयांची स्थावर मालमत्ता असून ३२ लाख २८ हजार ९८९ रुपयांचे कर्ज आहे. लंके यांच्याकडे ५० हजार रुपये रोख.

१३ हजार ९७७ रुपयांच्या ठेवी व शेअर्स, १७ लाख ३ हजार ६८८ रुपयांची बस, २६ लाख ७५ हजार ९३६ रूपयांची कार, १३ लाख २२ हजार २६० रुपयांची बस, ७ हजार १०० रुपयांची दुचाकी, ७६ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत.

त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांच्याकडे ४० हजार रोख, ४ हजार ७३५ रुपयांच्या ठेवी, १ लाख १४ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. नीलेश यांच्याकडे १५ लाख ३५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News