अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.
वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.
दरम्यान संगमनेरात गोवंश तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरू लागले आहे. शहरात एका व्यावसायिकांनी चक्क ‘दुध’ वाहतुक करणाऱ्या वाहनाचा वापर करीत आपले काळे धंदे पांढरे दाखवण्याचा प्रयत्न केला,
मात्र संगमनेर तालुका पोलिसांनी त्यावर कारवाई करीत कसायांचे उद्योग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहेत. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेरकडून पुण्याकडे निघालेल्या व दूध असे लिहिलेल्या एका आयशर टेम्पोवर (क्र.एम.एच.03/सी.पी.8858) पोलिसांचा संशय बळावला.
हिवरगाव टोल नाक्यावर नाकाबंदीवर असलेल्या तालुका पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक गडबडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घालीत त्याला ताब्यात घेतले. यावेळी ‘दूध, असे लिहिलेल्या त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे मांस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
सदरचा टेम्पो व त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन टेम्पोतील गोवंश मांंसाची मोजदाद केली असता ते सुमारे चार हजार किलो भरले.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी पोलीस नाईक यमना जाधव यांच्या फिर्यादीवरून सदर वाहनाचा चालक नाथा मनोहर रसाळ (वय लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved