अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- खाजगी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. लक्झरी बस ( क्रमांक एम.एच. ३८- एक्स – ८५५५ ) व परभणी येथून पुण्याकडे जात होती.
तर सेंट्रो कार ( क्रमांक एम.एच. १२ सी. डी. २९१२ ) पाथर्डीकडे चालली होती. या दोन्ही वाहनांची करंजीजवळ असलेल्या सुभद्रा हॉटेलसमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात सेंट्रो कारमधील केशव विलास बोराडे ( वय २५, रा. कोथरूड, पुणे),

परमेश्वर लक्ष्मणराव डाके ( वय ४०, रा. सदर), बाळासाहेब शंकरराव कदम (रा. धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी) हे तिघे जण जागीच ठार झाले.
तर सेंट्रो कारचा चालक विनोद धावणे याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजता झालेल्या या अपघात वाहनांची धडक होताच मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या वस्तीवरील लोक रस्त्यावर आले. तोपर्यंत लक्झरीचा चालक फरार झाला होता.
अपघाताची खबर मिळताच देवराई येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पालवे, गणेश अकोलकर, प्रमोद क्षेत्रे, आशिष क्षेत्रे यांनी तत्काळ महत केली. जखमींच्या मदतीसाठी महामार्ग पोलिस व पाथर्डी पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना मदत केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved