हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; 19 जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- वाढत्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. नुकतेच एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला असून या ठिकाणाहून अनेकांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कल्याण रोडवरील दीपाली हॉटेल हे सचिन शिंदे यांच्या मालकीचे आहे. विशाल सुपेकर आणि गणेश राजळे हे भागीदारीत हॉटेल चालवित होते.

तेथे विनापरवाना हुक्का पार्लर सुरू होता. याबाबतची माहिती मिळल्यानंतर कोतवाली पोलिसांनी दीपाली हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात 19 हुक्का बहाद्दरांना अटक केली.

तसेच विनापरवाना हुक्का पार्लर चालविल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी 4500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान हॉटेलचे मूळ मालक सचिन चंद्रशेखर शिंदे हे पसार झाले आहेत.

19 हुक्का बहाद्दरांना अटक ओंकार प्रवीण कडपील्ली (नालेगाव), भावेश कैलास कुरापाटी (दिल्लीगेट), रोहीत ज्ञानेश्वर गुडा (तोफखाना), मोमीन कुतुबुद्दीन मोवीन (रेल्वे स्टेशन), साहील सलीम शेख (रेल्वे स्टेशन),

कार्तिक अशोक नरवडे (मोहिनीनगर, केडगाव), संतोष सूर्यभान शिरसाठ (दूधसागर, केडगाव), ओंकार नरेंद्र दुल्लम (बागडपट्टी), ओंकार गणेश रायपेल्ली (मोची गल्ली), रूपम गणेश भागवत (मोची गल्ली),

मणियार शाहबल अब्दुल करीम (मोमीनपुरा), अजहर रफीक शेख (आशा टॉकीज चौक), अरबाज मुश्ताक शेख (गोविंदपुरा), परवेझ नियाज तांबोळी (रामचंद्र खुट), उबेत अफरोज तांबोळी (रामचंद्र खुंट),

अरबाज सय्यद (सुभेदार गल्ली), रईस नफीस खान (मुकुंदनगर), शादाब सादीक शेख (सुभेदार गल्ली) आणि हॉटेल मॅनेजर विशाल किशोर चव्हाण (शिवाजी नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.