बापरे! ओव्याचे आहेत इतके फायदे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-ओवा खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.ओवा खाण्याने बऱ्याचशा शारीरिक तक्रारींना आपण थांबवू शकतो.

कोणतीही किरकोळ शारीरिक तक्रार किंवा एखाद्या पदार्थाची चव वाढवायला ओवा मदत करते.त्याबरोबरच ओवा खाण्याचे अनेक विविध फायदे पण आहेत.

ओवा खाणे अनेक शारीरिक तक्रारींमध्ये फायदेशीर ठरते.ओवा खाण्याचे काही फायदे पण आहेत.ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होतो. दमा असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर आवर्जून ओवा खाण्याचा सल्ला देतात.

घरात कधी कोणाचे दात दुखत असतील तर त्याला ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.कधी जुलाब होत असतील तर ओवा खायला दिला जातो.

ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो.कोणाच्या तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला दिला जातो.मूळव्याधीवर त्रास ओव्यानेच कमी होतो.

कोणाला ताप आला तर त्याला आजारपणात ओवा खायला दिला जातो.पांढरे केस पण ओव्यामुळे कमी होतात. जंताचा त्रास पण ओव्याने कमी होतो.

मधुमेहावर पण ओव्यामुळे नियंत्रण मिळवता येते.वात विकार असणाऱ्या लोकांना पण ओवा खायला सांगितल जातो. वजन वाढलेल्या व्यक्ती पण आहारात ओव्याचा समावेश करतात.दातदुखीमुध्ये ओव्यामुळे आराम मिळतो अस सांगण्यात येत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News