अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-बस स्टॅन्ड परीसरात प्रवासी लोकांचे सोने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस राजुर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 26 डिसेंबर रोजी फिर्यादी कुसुम लक्ष्मण नाडेकर (वय -49 रा.पिचडशाळेजवळ, राजुर ता.अकोले जि.अहमदनगर) यांचे राजुर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञात इसमांनी पर्स मधुन 96,000/-रु.किमतीचे सोन्याचा नेकलेस चोरुन नेला होता.
याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान राजूर पोलिसांना या गुन्ह्याविषयी मिळालेल्या महितीनुसार पोलिसांनी अकोले स्टॅन्ड येथे जावुन आरोपी साहिल नाशिर खान (वय 21 वर्षे,रा.श्रीरामपुर) ,
अर्जन कानिफनाथ भोसले (वय 21 वर्षे, रा.श्रीरामपुर), कमलेश उत्तम पवार (वय 21 वर्षे, रा.श्रीरामपुर), गुफरान निसार पठाण (वय 21वर्षे,रा. श्रीरामपुर) यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी यापुर्वीही राजुर परीसरात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांना मुद्देमालासह राजुर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे तसेच तपास चालु आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved