अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांना लाचखोरीचे व्यसन लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस प्रशासन मध्ये लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे.
नुकतेच अशाच दोन भ्रष्ट पोलिसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वाळूच्या तीन ट्रक अनधिकृतपणे गुजरात ते शिर्डी अशी वाळू वाहतूक करतात.
सदरच्या ट्रक मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीतून पास होताना त्यांची अडवणूक करुन काही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्यांना लाचलुचपत विभागाने आज (दि. २८) रंगेहाथ पकडले.
लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतोष बाळू पागी (वय ३५, पोलीस नाईक), आणि दिलीप बाजीराव निकम (वय ५१, पोलीस हवालदार) दोघे नेमणूक – मनमाड शहर पोलीस ठाणे. ता- मनमाड, जि नाशिक.) अशी या दोन लाचखोर पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved