अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे
जितेंद्र भाऊ उर्फ दुधकल्या भोसले( वय 31 राहणार घोसपुर तालुका नगर मूळ राहणार पढेगाव तालुका कोपरगाव) राहुल टक्कर्या भोसले वय 27 राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
26 डिंसेबर रोजी अजिंक्य चंद्रकांत गोगावले (रा. हवेली जि. पुणे) यांना व त्यांच्या मित्राला नगर जिल्ह्यात स्वस्तात जमीन देतो असे फोनवर बोलवून आरोपींनी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे बोलवून घेतले.
यावेळी सहा ते सात जणांनी गोगावले व त्यांच्या मित्रावर दगडफेक करून मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याची चैन असा एक लाख 30 हजार रूपयांचा ऐवज लुटला होता.
गोगावले यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. त्यानुसार पोलीस पथकाने सोमवारी घोसपुरी शिवारात जितेंद्र भोसले व राहुल भोसले यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता इतर तिघांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबूली दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील करण भारत ऊर्फ दुधकल्या भोसले, देवेंद्र भारत ऊर्फ दुधकल्या भोसले (दोघे रा. पढेगाव ता. कोपरगाव), अनिल टकर्या भोसले (रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) हे तिघे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved