नव्या कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकार करणार ‘असे’ काही ; वाचा …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही हे प्रमाण जास्त आहे. आता कुठे हि परिस्थिती शांत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशत निर्माण झाली आहे.

आता भारतामध्येही या बाबत आधीच दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने नियम आणि सूचना नव्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी तयार केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं कोव्हिड-19 बाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं जे काही नियम बनवले आहेत त्यांची मर्यादा 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली आहे. कंटेनमेंट झोनमधून कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा तिथं येणार नाही याची काळजी घ्यावी.

तसंच या भागातील व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नियमांचं सक्तीनं पालन करावं. देशातील विविध भागात काही नागरिक ब्रिटनहून परतले आहेत.

त्यांची कोरोना टेस्ट केली त्यापैकी काही रुग्ण कोरोना प़ॉझिटिव्ह आढळले आहेत. पण त्यांना नवा कोरोना झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या उपचारासाठी तयार केली जाणारी लस या नव्या विषाणूच्या उपचारात प्रभावी ठरेल की नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर ब्रिटेन मीडिया असा दावा करीत आहे की ऑक्सफोर्ड विद्यापीठ व एस्ट्राजेनेका (Oxford/AstraZeneca vaccine) यांनी विकसित केलेली कोविड – 19 ही लस वेगाने पसरणार्‍या कोरोना विषाणूच्या नवीन स्‍ट्रेन वरही प्रभावी ठरेल.

ऑक्सफोर्डच्या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने करार केला असून लवकरच तो ब्रिटनमध्ये मंजूर होणार आहे. यानंतर, लसीकरणाच्या कामास गती येईल. सीरमबरोबरच्या कराराचा फायदा भारतालाही होईल अशी अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe