जवानाने केली आत्महत्या; पंख्याला घेतली फाशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने गळ्याला फास लावून आत्महत्या केली आहे. हि घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असणारे जवान सुनील भीमराव जाधव(३५,बक्कल न १०५४) यांनी आत्महत्या केली आहे. सदर मृत जवान कोल्हापूर येथील होते.ते त्यांची पत्नी आणि लहान मुलासोबत राखीव पोलीस दलाच्या वसाहतीमध्ये राहत होते.

२९ डिसेंबरच्या पहाटे त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना सुनील यांचा मृतदेह हॉल मधील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेही माहिती राखीव पोलीस दलाच्या अधिकार्याना कळल्यावर त्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली.

या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात पण देण्यात आलं . मयत जवान सुनील जाधव हे मूळचे कोल्हापूर येथे राहायला होते. शिनोळी येथे राज्य राखीव पोलीस दलाची २००६ मध्ये भरती झाली होती.त्यात सुनील जाधव हे भरती झाले होते.

जाधव यांनी नक्षलग्रस्त भागात तसेच निवडणूक बंदोबस्तासंदर्भात कामगिरी बजावली होती.त्यांचा पोलीस दलात सगळ्यांशी हसून खेळून मनमिळावू स्वभाव होता. त्यांनी आत्महत्या का केली? याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस पुढील तपास करत असल्याचे कळतय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment