कोट्यवधींचा अपहार करणाऱ्या डॉ. शेळकेंच्या पोलीस कोठडीत वाढ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता या पोलिस कोठडीत दि.2 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नगरमधील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी डॉ.शेळके याच्यावर गुन्हा दाखल आहे.

दरम्यान नगरमधील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित बाळ बोठे याचा शोध घेत असताना पोलिसांनी पुण्यातून डॉ.निलेश शेळके याला ताब्यात घेतले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News