भाववाढ द्या अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-गेल्या वर्षी कारखान्याने दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत टनाला भाव दिला होता. तर यावर्षी उसाला 2 हजार 550 रुपये भाव न दिल्यास दि. 12 जानेवारीपासून ऊस तोड आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबत संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी वृध्देश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांना लेखी निवेदन दिले आहे.

दरम्यान तिसगाव वृध्देश्वर साखर कारखान्याचे गाळप सुरू होऊन गेली दीड ते दोन महिने झाले तरी देखील ऊस दराची कोंडी कायम आहे.

यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा असून कारखान्यांनी यावर्षी लाभधारक सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या उसाची वेळेत तोड करून त्यांना मागील वर्षी पेक्षा अधिक भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe