अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 77 जणांच्या पहिल्या यादीत रोहित पवार यांचं नाव आहे. भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार मैदानात उतरले आहेत
कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अक्काबाई मंदीरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर सभा होणार आहे.

शरद पवार यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. स्वत:वर विश्वास ठेव, लोकांवर विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत कष्ट घे, असे त्यांचे शब्द होते, असे रोहित पवारांनी सांगितलं.
मी सतत हेच सांगतोय की माझी लढत राम शिंदेंविरोधात नाही, तर माझी लढत अशा विचाराविरोधात आहे, जो विचार सर्वसामान्यांना विश्वासात घेतलं नाही.
इथल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलं. त्याविचाराविरोधात मी लढत आहे. पुढचा व्यक्ती किती तगडा असला, तरी आपण किती कष्ट घेतो, लोकांचा किती विश्वास संपादन करतो ते महत्त्वाचं आहे, असं रोहित यांनी सांगितलं.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













