… आणि रस्त्यावरच कारने घेतला पेट,नंतर झाले असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कर्जत राशीन रस्त्यावर रात्री राशीहून कर्जतकडे येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच 11 बी व्ही 0 293 या गाडीने अचानक पेट घेतला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारचालक सुदैवाने बचावला.

यावेळी गाडी चालवत असणारे प्रशांत पांडुरंग जमदाडे (रा. राशीन, ता. कर्जत) यांनी तात्काळ राशिन पोलिस स्टेशनमध्ये याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ कर्जत येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत कळवले.

त्यानंतर चंद्रशेखर यादव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. यानंतर तिथे कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाची गाडी व कर्मचारी पोहोचले. दरम्यान, स्थानिक नागरिकही त्या ठिकाणी धावत आले आणि सर्वांनी मिळून ही आग आटोक्यात आणली.

एवढेच नव्हे तर कारमध्ये अडकलेल्या प्रशांत जमदाडे यांनादेखील सहीसलामत कारच्या बाहेर काढण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News