माजी पालकमंत्री राम शिंदे यांची खासदार राऊतांवर टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा शिवसेनेनकडे वळविला आहे.

माजी पाललकमंत्री राम शिंदे यांनी आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नुकतेच संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून शरद पवार यांचे कौतुक करत UPA चे नेतृत्व शरद पवारांनी करावं असं म्हटलं.

मात्र संजय राऊत हे UPA चे प्रवक्ते कधी झाले हे पाहावे लागेल अशी कोपरखळी राम शिंदे यांनी मारली. बिहारमध्ये निवडणूक लढवली तर 2 अंकी संख्या पण नाही मिळाली,

त्यामुळे संजय राऊत यांनी आपलं बघावं दुसऱ्याचं सांगायची आवश्यकता नाही अशी टीका राम शिंदे यांनी केली. तसेच ईडी प्रकरणावरून देखील शिंदे यांनी खासदार राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांना ED ची नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय सूडबुद्धीने ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

मात्र हे चुकीचं असून ED चौकशी लागल्याने संजय राऊत यांचं घबाड उघडं पडेल या भीतीने त्यांच्या बुद्धीचे लक्तरे उघड होत आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment