‘ईडी’ च्या आधीच ‘नाथाभाऊ’ अडकले कोरोनाच्या विळख्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता खडसे यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी केली होती.

ती पॉझिटिव्ह आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आपल्याला समन्स प्राप्त झाले होते. त्यानुसार आज ईडी (ED) कार्यालयात जाणारच होतो. परंतू, आरोग्याबाबत तक्रारी असल्याने डॉक्टरांनी 14 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे 14 दिवसानंतर पुन्हा ईडी कार्यालात उपस्थित राहणार आहे. आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

महाविकासआघाडी सरकारचा भाग असलेल्या घटक पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक,

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आणि इतरही काही नेत्यांचा समावेश आहे. या आधी शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह आणखी काही नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment