मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणीचा शिवसेनेत प्रवेश

Published on -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला येवले यांनी बुधवारी (२ ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे येवले यांनी हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समन्वयातून येवले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. अकोले येथे १३ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आली होती. 

सरकारचे महापोर्टल बंद करावे, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या करीत येवले यांनी शाईचा फुगा मुख्यमंत्र्यांचा ताफ्यामधील वाहनांच्या दिशेने फेकला होता. याप्रकरणी शर्मिला येवले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

सप्टेंबर महिन्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नगर शहरामध्ये आले असताना शर्मिला येवले यांनी त्यांचीही भेट घेतली होती. त्यातच आता त्यांनी थेट भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News