औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास कॉंग्रेसचा स्पष्ट नकार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- औरंगाबाद दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामाकरण करण्याचस विरोध दर्शवला आहे.

‘औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होऊ देणार नाही, आमच्या त्याला विरोध असेल, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान औरंगाबादचं लवकरच नामकरण संभाजीनगर होणार याची चर्चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या दोऱ्या नंतर सुरु झाली होती आणि या नामांतरणासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली देखील सुरु आहे.

मात्र या नामांतरणाला काँग्रेसच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. यातच कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आपले मत व्यक्त केले आहे.

थोरात म्हणाले कि, महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं.

नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही, नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. असे स्पष्ठ मत थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe