88 ग्रामपंचायतींसाठी सव्वा दोन हजारांवर अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता, यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान पारनेर तालुक्यातील मुदत संपणार्‍या 88 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 2 हजार 389 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

इच्छुकांच्या गर्दीने तहसील कार्यालयाच्या आवाराला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 71 उमेदवारी अर्ज सुपा ग्रामपंचायती मधून तर सर्वात कमी 7 उमेदवार जाधववाडीतून दाखल झाले.

या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने त्या दिवशी ग्रामपंचायत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.