अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकंना नेहमीच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. अनेकदा कारवाई करून देखील अतिक्रमण धारक सुधारायला तयार नाही.
मात्र नुकतेच पारनेर बसस्थानक परिसरातील तसेच तहसील कार्यालयाशेजारील अतिक्रमणांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यामुळे अनेक दिवसानंतर बस स्थानक परिसराचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे.
पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेली दोन दिवस तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी होत होती.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानक परिसरातही अतिक्रमणामुळे नेहमी कोंडी होत होती. तहसील कार्यालय, तसेच बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले होते.
काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. मात्र, काही तशीच होती. अखेर तहसीलदार देवरे व पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मदतीने प्रथम तहसील कार्यालयाजवळील व नंतर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढली. त्यामुळे तहसील कार्यालय व बसस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve