धक्कादायक ! धावती कार अचानक पेटली; तलाठी बालबाल बचावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- कर्जत येथील बेनवडी फाटा शिवारातील पुलाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी कारचालक जामखेड येथील तलाठी सुखरूप बाहेर निघाल्याने पुढील अनर्थ टळला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी जामखेड तालुक्यातील तलाठी प्रशांत पांडुरंग जमदाडे हे काम आटोपून कर्जतहून राशीनकडे जात होते.

त्यांची स्विफ्ट कार (एमएच ११ बीव्ही ०२९३) ही बेनवडी फाटा शिवारातील पुलाजवळ आली असता कारने पेट घेतला. तलाठी जमदाडे यांनी कारबाहेर येऊन राशीन पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे,

हेडकॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते, मारुती काळे, गणेश भागडे, भाऊसाहेब काळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी संपर्क साधला.

पोलिस निरीक्षक यादव यांनी कर्जत नगर पंचायतचा अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करून पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment