अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- अपघातातील कोणत्याही प्रकारचे वाहने जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. जर अशा प्रकारचे कृत्य कोणाबरोबर घडत असेल तर त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
पोलिस ठाण्यांमध्ये जुनी वाहने पडून आहेत. वास्तविक पाहता त्या वाहनांचा लिलाव अपेक्षित आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. अनेक वाहनांमध्ये संबंधितांना इन्शुरन्स मिळालेला असतो व त्यानंतर ती वाहने घेऊन जात नाही. त्यामुळे ती वाहने पोलिस ठाण्यांमध्ये पडलेली आहेत.
अशा बाबी आता लक्षात आल्यानंतर त्याची एकत्रित माहिती करून पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिस ठाण्यांना दिले आहे. दरम्यान अपघातामध्ये अनेक वाहने पकडली जातात. ती पकडलेली वाहने फक्त पंचनामा तसेच आरटीओची माहिती घेण्याइतपत त्याला दोन दिवसाची मुदत देण्यात यावी.
मात्र दुसरीकडे पोलिसांना कोणतीही वाहने जप्त करण्याचा अधिकार नाही. जर अशा प्रकारची कारवाई कोणी पोलिसांनी केली असेल तर नागरिकांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती द्यावी. अप्पर पोलीस अधीक्षक अथवा शहर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे थेट याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved