अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- काही दिवसांपूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत काही बातम्या पसरल्या होत्या. तेल कंपन्या आता दररोज किंवा साप्ताहिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती बदलण्याचा विचार करीत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता.
परंतु आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत सरकारने महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
सरकारने किमतीबाबत वरील दावा पूर्णपणे फेटाळला आहे. गव्हर्नमेंट फॅक्ट चेकर पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीटद्वारे माहिती शेअर केली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की तेल कंपन्या आता दररोज किंवा साप्ताहिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती बदलण्याचा विचार करीत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.
हा दावा खोटा आहे. भारत सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल जाहीर केला नाही. पीआयबीने व्हायरल न्यूज कटिंग्जही शेअर केल्या आहेत. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की डिसेंबरमध्ये दोनदा किंमत वाढविल्यानंतर एलपीजीचे वितरक आता दर आठवड्याला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती बदलतील.
याबरोबरच असेही म्हटले आहे की हा बदल दररोज देखील होऊ शकतो. तथापि, सरकारने त्यास पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पीआयबी फॅक्ट चेकने रेशन संदर्भात देखील महत्वाची माहिती दिली आहे. तीन महिन्यांसाठी रेशनकार्ड न वापरल्यास तो रद्द केला जाईल, असा केलेला दावाही त्यांनी फेटाळला आहे.
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये असे म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘काही मीडिया रिपोर्ट्स दावा करीत आहेत
की केंद्र सरकारने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत की रेशन तीन महिन्यांपर्यंत न घेतल्यास शिधापत्रिका रद्द केली जाऊ शकते. हा दावा बनावट आहे. केंद्र सरकारने असे कोणतेही मार्गदर्शक सूचना दिलेली नाही. ‘
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved