सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी केले मोठे विधान; ते म्हटले की

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग हत्या प्रकरण मागच्या वर्षात सगळ्यात जास्त गाजल.प्रथम महाराष्ट्र पोलिसांनी केलेली चौकशी नंतर सीबीआय कडे सोपवण्यात आली.

तेच सीबीआय अधिकारी आता लवकरच या मृत्यूप्रकरणाच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचणार असल्याचे कळतय.मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मतानुसार, जो निष्कर्ष सीबीआय काढेल तो आमच्या तपासाशी मिळत जुळत असेल.

अखेर सत्याचाच विजय होईल असं ते म्हटले आहेत. मागच्या वर्षी विविध चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली मालमत्ता शुक्रवारी तक्रारदारांना आयुक्तांच्या हस्ते देण्यात आली त्या वेळेस ते बोलत होते.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणावरून प्रथमतः मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला. तो तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

मात्र अद्याप याबाबतचा अंतिम अहवाल मिळालेला नाही. सुशांतसिंह प्रकरणाशी पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी निष्कर्ष काढला. त्याला सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रोफेशनल’ तपास असे म्हटले.त्यानंतर सीबीआयकडे हा तपस देण्यात आला.

सीबीआयने जो निष्कर्ष काढला तो आमच्या तपासाशी सुसंगत असेल असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या तपासावर पूर्ण विश्वास ठेवल्याचा पण पुनरुच्चार केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment