अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राहुरी येथील आठवडे बाजारात मोबाइल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांचे किमती मोबाइल लांबवण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नवीपेठ, तसेच नगर परिषद अग्निशमन कार्यालयासमोर या घटना घडल्या.
नागरिक भाजीपाला खरेदी सुरू असताना भामट्यांनी खिशातील मोबाइल लांबवले. चोरी गेल्याचे लक्षात येताच संबंधितांनी आठवडा बाजारात शोध घेतला, मात्र तो व्यर्थ ठरला.
श्रीरामपूर येथील भामट्यांची सराईत टोळी या धंद्यात सक्रिय असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी यापूर्वी साध्या गणवेशात पोलिसांची गस्त सुरू होती. बंद पडलेली गस्त पुन्हा सुरू होण्याची गरज आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved