अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे.
पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते.

त्यानंतर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यात त्यांनी शिवसेना, भाजपच्या उमेदवारांवर मात केली. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. बहुजन समाज पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













